World News,Farmaer Skim,Job Latest 2023

Namo Mahasanman Nidhi 2023 : शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक ६ हजार रुपये; नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी

Namo Mahasanman Nidhi 2023  : शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक ६ हजार रुपये; नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी

BY :- Vacancy Nama

Namo Scheme : नमो शेतकरी महासन्मान योजनेमार्फत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये देण्याच्या घोषणेला मंत्रिमंडळाला बैठकीत मंगळवार (ता.३०) रोजी मंजूरी देण्यात आली.

Farmer Good News : नमो शेतकरी महासन्मान योजनेमार्फत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये देण्याच्या घोषणेला मंत्रिमंडळाला बैठकीत मंगळवार (ता.३०) रोजी मंजूरी देण्यात आली. तसेच १ रुपयांत शेतकऱ्यांना पीक विमा देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये या दोनही निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर वार्षिक ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.

या योजनेमधून शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून वार्षिक १२ हजार रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेला पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानचा लाभ दिला जाणार आहे.

Apply Direct       :-  Click Here
Check Eligibility :-  Click Now 

वर्षातून चार महिन्यांच्या अंतराने २ हजारांचे तीन हप्ते राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. अखेर मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी येणारे अडथळे लक्षात घेता राज्य सरकार नमो सन्मान योजनेत अशा समस्या येऊ नयेत याची दक्षता घेणार आहे.

राज्यातील ८३ लाख शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो सन्मानचा लाभ मिळणार आहे.

Share:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Popular Posts

@ PM Nama. Blogger द्वारे प्रायोजित.

Footer Copyright

Design by - Graphics Nama
Distributed by-PM Nama

Pages